Article

महिला बॉडी बिल्डिंगमध्ये गरुड झेप घेणाऱ्या नाशिकच्या स्नेहा कोकणे

शरीर सौष्ठवपटू स्नेहा सचिन कोकणे यांनी मिस इंडियन बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप 2019 मध्ये दुसऱा क्रमांक मिळवला आहे. स्नेहा यांच्या करिअरचा प्रवास खरं तर लग्नानंतर झाला. सचिन कोकणे हे कराटे चॅम्पियन असून त्यांनी पत्नी स्नेहाला गृहिणी किंवा घरातल्या कामात न अडकवता. कराटेचं प्रशिक्षण दिलं. महाराष्ट्रात अनेक महिला कराटेचं प्रशिक्षण घेतात मात्र महिला बॉडी बिल्डिंग मध्ये फार क्वचित जणी पाहायला मिळतात. मात्र सचिन यांनी पत्नी स्नेहाला प्रशिक्षण देत अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिलं. स्नेहा गृहिणी असताना कराटेच्या ब्लॅक बेल्ट विजेत्या झाल्या. त्यानंतर त्यांनी हजारो मुलींना स्वसंरक्षणाचे मोफत प्रशिक्षण दिलं आहे. हळूहळू हा प्रवास उंच शिखरांजवळ येऊन पोहचला आहे. महिला बॉडी बिल्डिंगमध्ये गरुड झेप घेत स्नेहा कोकणे यांनी डायमंड कप इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत सिल्व्हर मेडल पटकावले. नाशिक फिटनेस 2018 नाशिक श्री, महाराष्ट्र श्री आदी स्पर्धेच्या विजेत्या झाल्या. तसेच राष्ट्रीय स्तरावरील बॉडीबिल्डर स्पर्धेसाठी राज्याचे नेतृत्व करीत आहे.

 

271 views
Ads

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

cool good eh love2 cute confused notgood numb disgusting fail