Article

जेव्हा बापच आपल्या मुलीवर अत्याचार करतो….

हैदराबाद बलात्कार प्रकरणा विरुद्ध तीव्र निदर्शने होत आहेत. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. बुलडाणा जिल्ह्यात अंढेरा पोलिस स्टेशन अंतर्गत मन हेलावून टाकणारी घटना घडली. येथे चक्क जन्मदात्या बापानेच आपल्या १६ वर्षीय मुलीवर दुष्कर्म केले. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पीडित मुलिची पोलिस स्टेशन ला तक्रार दिली असुन पोलिसांनी बलात्कारचा गुन्हा दाखल करून आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे.

चिखली तालुक्यातील अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात एका 38 वर्षीय नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीवर मागील दोन महिन्यांपासून झोपेच्या गोळ्या खाऊ घालून लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. पीडित मुलीला सावत्र आई असून तिला ही हकिकत सांगितल्या नंतर ही तिने गप्प राहण्यास सांगितले शिवाय तिला मारहाण ही केली. मात्र दररोज च्या अत्याचार सहन न झाल्याने पीडित मुलीने दोन दिवसांपूर्वी आपले घर सोडले. दरम्यान ही मुलगी चिखली शहरात फिरत असतांना तिथे काही सामाजिक कार्यकर्त्यांना च्या नजरेत आल्याने तिला विचारपूस केल्यानंतर तिने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती कार्यकर्त्यांना दिली. बापाने आपल्या मुलीवर केलेल्या दुष्कर्मांची माहिती कार्यकर्त्यांनी पीडितेला घेऊन अंढेरा पोलीस स्टेशन गाठून तिथे रीतसर तक्रार नोंदवली या तक्रारीवरून नराधम बापाला विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी बापाला अटक करण्यात आली आहे. या घटनेने जिल्ह्यात खडबळ उडाली आहे. पहा हा व्हिडिओ

 

 

 

 

 

 

 

452 views
Ads

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

cool good eh love2 cute confused notgood numb disgusting fail