Article

तुम्ही सुद्धा नक्की तुमच्या तिला हा अनुभव द्या!

प्रत्येक वर्षी जून महिन्यात महिलांना pampering( यथायोग्य काळजीचं) भाग बनवणारा ओडिशाचा 4 दिवसांचा सणरजा परबा प्रत्येक राज्याने साजरा करण्याजोगाच आहे. या 4 दिवसांत जगन्नाथाची पत्नी म्हणजेच पृथ्वी माता मासिक पाळीच्या दिवसांत असते असं तेथील लोकांची श्रद्धा असल्याने या 4 दिवसात भूदेवीला आराम दिला जातो. या दिवसात तिला त्रास होईल अशी सर्व कामं थांबवली जातात आणि तिला पूजलं जातं.

प्रत्येक दिवसाचं एक वैशिष्ट्य असून प्रत्येक दिवसाला एक नाव आहे.. पहिल्या दिवसाला पहिली रज्जो, दुसऱ्या दिवसाला मिथूना संक्रांती, तिसऱ्या दिवसाला भू-दाहा किंवा बासी रजा, आणि चौथ्या शेवटच्या दिवसाला वसुमती स्नान म्हणतात.

पहिल्या पावसाचं स्वागत कारण्यासाठी धरती जशी आसुसलेली असते तशीच लग्नासाठी कुमारिका या दिवसात तयार होत असतात. या उत्सवाचा थेट संबंध अश्या मुली-लग्न न झालेल्या स्त्रियांशी जोडला जातो. ज्या त्या काळात मासिक पाळीत असतात. या 4 दिवसात सुंदर सुंदर कपडे घालून, अलथा लावून साजशृंगार करून या मुली स्वयंपाक घर पूर्णतः बंद ठेवतात. अथवा या दिवसात स्वयंपाक घरावर पुरुषांचा कब्जा असतो. रुचकर पदार्थ बनवून ते या स्त्रियांना खाऊ घालतात. सोबत अनेक मनोरंजक खेळ खेळून या स्त्रिया वाऱ्यावर स्वार होऊन झुला झुलतात. पहिल्या दोन दिवशी आणि चौथ्या दिवशी केसांना सुगंधित तेल लावून, चंदन आणि अंगाला हळद लावून, फुलांच्या माळा घालून भुदेवीसोबतच या स्त्रिया स्नान करून सणाची सांगता करतात.

मासिक पाळी हा महिलांच्या आयुष्यातील सगळ्यात त्रासदायक काळ असतो… ज्या वेळात स्त्रियांची चिडचिड होते, शारीरिक दुखणं वाढतं, मनस्तिथी खालावते.. त्यामुळे प्रत्येक घरातील स्त्रीला या काळात pampering खूश राहण्यासाठी positive वातावरण नक्कीच मिळालं पाहिजे.. तर हे वरदान खऱ्या अर्थाने फुलेल, फळेल, बहरेल !

प्रतीक्षा मोरे

Pratikshamore15@gmail.com

 

473 views
Ads

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

cool good eh love2 cute confused notgood numb disgusting fail