Article

म्हणून केली तिने बाळाची चोरी…!

एखाद्या महिलेला मूल होत नसेल तर समाज कशा पद्धतीचा दबाव टाकतो याचे उदाहरण नुकतेच समोर आले आहे. मुंबई सेंट्रलच्या नायर रुग्णालयातून बाळ चोरलेल्या डेझल कोरिया या महिलेला मूल होत नसल्याने तिचा पती चिडचिड करीत असे. त्यातूनच तिने बाळचोरीचे पाऊल उचलल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. 

काय आहे प्रकरण?

व्ही. एन. देसाई रुग्णालय प्रशासनाला डेझलविषयी संशय येताच, त्यांनी याबाबतची माहिती वाकोला पोलिसांना दिली. वाकोला पोलिसांचे पथक रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी आग्रीपाडा पोलिसांशी संपर्क साधला. त्यांनी डेझलला ताब्यात घेतले. डेझल नालासोपारा येथे राहणारी असून, तिने घटस्फोटानंतर दुसरे लग्न केले होते. दुसरे लग्न करूनही बरेच दिवस मूल होत नसल्याने तिचा पती चिडचिड करायचा. यामुळेच मूल चोरल्याची कबुली डेझलने दिल्याचे आग्रीपाडा पोलिसांनी सांगितले.

असं गेलं बाळ चोरीला?

नायर रुग्णालयात प्रसूतीनंतर शीतल साळवी आणि त्यांच्या बाळाला वॉर्ड क्रमांक सातमध्ये दाखल करण्यात आले होते. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास डेझल नायर रुग्णालयात शिरली. शीतल यांना झोप लागली होती आणि बाळाकडे कुणाचेच लक्ष नसल्याचे पाहून तिने मूल उचलले. एका पिशवीत गुंडाळून ती रुग्णालयातून बाहेर पडत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. महिला लवकरात लवकर पकडली जावी आणि बाळाची सुखरूप सुटका व्हावी यासाठी आग्रीपाडा पोलिसांसह सर्व पोलिस ठाण्यांमध्ये हे फूटेज धाडले.

या प्रकरणाचा गुन्हा म्हणून नोंद केली आहे. तसेच बाळ चोरून तिने नक्कीच गुन्हा केलेला आहे.  मात्र अशा असंख्य महिला आपल्या अवती-भोवती आहेत ज्यांना मूल होत नसेल  तर त्या महिलांना विविध पद्धतीच्या दबावाला सामोरं जावं लागतं.

मूल नं झाल्यास होणार छळ

महिलांना टोपणे मारणे

वांजूटी अशा अनेक नावाने त्यांना हिणवणे

मुल होण्यासाठी अंधश्रद्धेला बळी पडणाऱ्या महिला

सासर घरातून होणारा छळ

अशा घटना वाढत असतील तर नक्की गुन्हेगार कोण असा प्रश्न या प्रकरणावरुन उपस्थित होतं.

205 views
Ads

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

cool good eh love2 cute confused notgood numb disgusting fail