Article

#kingmaker सुनेत्रा पवार

#kingmaker : सुनेत्रा पवार

सुनेत्रा पावर यांची ओळख ही फक्त माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची पत्नी इतकीच मर्यादीत नाही. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी केलेल्या सामजिक कार्यामुळे बारामतीमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची खरी ओळख ही ‘वहिनी’ म्हणून आहे.

मराठवाड्यातील एका राजकारणी घरात १८ ऑक्टोंबर १९६३ साली सुनेत्रा पवार यांचा जन्म झाला. त्यांचे मोठे भाऊ डॉ.पद्मसिंह पाटील यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन यामुळे त्यांना पुढे सासरच्या राजकीय कुटुंबात रूळायला जड गेले नाही. १९८५ साली अजित पवार यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि त्या बारामतीतील काटेवाडीच्या वहिनी झाल्या. पवारांची सुन अशी जरी त्यांची ओळख असली तरी विविध सामाजिक कार्यांच्या माध्यमातून त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

‘एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया’(Environmental forum of India) या संस्थेच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांनी पवार कुटुंबीयांचे मुळ गाव काटेवाडीचा विकास केला. शिवाय पहिले निर्मल आणि इको फ्रेंडली गाव म्हणून त्याला भारताच्याच नव्हे तर जगाच्या नकाशावर मोठे स्थान प्राप्त करून दिले आहे. बारामतीसारख्या दुष्काळी भागाचा कायापलट करण्यात सुनेत्रा पवार यांचे विशेष योगदान आहे. त्यांच्या नेतृत्वांतर्गत पाणीपुरठा योजना, शैक्षणाक योगदान, घनकचरा व्यवस्थापन, दुष्काळ निवारण यांसारख्या अनेक योजना आणि उपक्रम राबवण्यात आले. त्यामुळे या गावाला अनेक पुरस्कारांनी गौवरवण्यात आले आहे.

यापुर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (ncp Sharad Pawar) यांनी बारामती मतदार संघ जोपासला, त्यानंतर हा मतदारसंघ अजित पवार सांभाळत आहेत. सध्याची परिस्थिती पाहता अजित पावर आणि शरद पवार हे प्रचारात सहभागी होत नसताना देखील सातत्यानं प्रचंड बहूमताने निवडून येत आहेत. अर्थात याचे श्रेय शरद पवार यांना तसेच अजित पवार आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलेल्या विकासकामांना आहे. परंतू याचे सर्वात मोठे श्रेय हे सुनेत्रा पवार यांना देखील जातं त्यांनी केलल्या सामाजिक आणि शैक्षणीक कांमामुळे लोकांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे.

यंदा विधानसभा निवडणूकीमध्ये बारामती मतदार संघातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विरोधात कडवी झूंज देण्यासाठी भाजपने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली होती. परंतु त्यांच्या आव्हानाला न जुमानता या मतदारसंघातून अजित पवारांनी पुन्हा एकदा विजयाची हॅट्रिक मारली आहे.

बारामती होम ग्राऊंड मध्ये अजित दादांचा पगडा भारी असल्याने त्यांनी पक्षाचा विजयी आकडा वाढवण्यासाठी उमेदवारांच्या प्रचाराकडे जास्त लक्ष दिले. त्यामुळे त्यांच्या पत्नी सुनेत्रा आणि मुलगा जय यांनी पवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. निवडणूकीचा प्रचार सुरू करण्यापुर्वी सुनेत्रा पवार यांनी जळोची येथील काळेश्वर मंदिरात नारळ वाढवून पतीच्या विजयाचं साकडं घातलं. त्यानंतर प्रचारासाठी पदयात्रा ही केली. पतीच्या विजयासाठी प्रचारात सक्रिय होऊन “विकासाचा वादा म्हणजे पुन्हा एकदा अजित दादा” हे सूत्र मनामनात रुजवले आणि त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले.

अजित पवार यांच्या विजयानंतर बारामतीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणा करत संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला. तसेच कार्यकर्त्यांनी अजित पावर यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या समवेत गुलालाची उधळण करून विजयोत्सव साजरा केला. यादरम्यान “मी काही सांगण्यापेक्षा कार्यकर्त्यांचा जल्लोषच सर्व काही सांगून जात आहे.” अशी प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांनी दिली.

#kingmaker सुनेत्रा पवार

644 views
Ads

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

cool good eh love2 cute confused notgood numb disgusting fail