Article

international mens day

स्त्री-पुरुष संबंध ‘सापशिडीचा खेळ’

स्त्री-पुरुष नाते संबंध वाटतो एक ‘सापशिडीचा खेळ‘.उघडपणे कबुल करा वा नाकारा…मोहाचे क्षण ब-याच जणांच्या आयुष्यात येतंच असतात. आपापल्या क्षेत्रात झटकन वर जाण्याच्या मोह,इर्षेपायी जाणते,अजाणतेपणी घेतला जातो.”शिडी”चा आधार.काम झाल्यावर ‘शिडी’ला काही कारणांनी पुरुषाने ढकलंल तर पुढे “आ वासून” असतात चवताळलेल्या नागिणी….

विविध कारणांनी एखादा / एखादीबद्दल आकर्षण असतं;वाटतं.एका हाताने वाजते ती चूटकी.त्या नादस्वराने जवळ आलेल्या संबंधात काही ना काही वितुष्ट आलं,संबंध ताणले गेले,तुटले की वाजवली जाते टाळी.सर्व फायदे घेऊन झाल्यावर खूप उशीराने तोंड उघडून केलेल्या तक्रारींमुळे पुरुषांचं सर्व ‘करिअर’च बरबाद होतं.त्यांच्या क्षेत्रातील सर्वोच्च पदाची क्षमता,पात्रता असताना त्यापासून वंचित रहावं लागतं.मला अशी बरीच उदाहरणे माहित आहेत जे “‘मी टू” आकांडतांडवाचे बळी,’They too’ आहेत.

यांतील सर्वात मोठा बळी मला वाटतं,’इंटरनॅशनल मॉनेटरी फंड’ च्या तत्कालीन प्रमुखांचा असावा.फ्रान्सचे भावी अध्यक्ष म्हणून पाहिले जाणारे हे गृहस्थ अमेरिकेत एका मैत्रिणीला पार्टीला घेऊन गेले.त्या महिलेने त्यांनी तिच्यावर अतिप्रसंग केल्याची तक्रार केली.झालं,त्यांच्यावर लगेच कारवाई होऊन ‘हाऊस अरेस्ट’ मध्ये ठेवलं गेलं;प्रतिदिनी ५,००० डॉलरच्या घरात.

नंतर रीतसर चौकशी होऊन तीत त्यांना निर्दोष ठरवण्यात आलं.व ती महिला अमेरिकेतही अवैध मार्गाने घुसल्याचं समोर आलं.परंतु तोपर्यंत फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी फॉर्म भरण्याची मुदत निघून गेल्याने राष्ट्राध्यक्ष होण्याचं त्यांचं स्वप्न तसंच विरलं. ..

अशी टीका करणं योग्य नाही,पण काही जणींत पुरुष कसा आकर्षिला गेला असेल,याचा संभ्रम पडतो.आपल्याकडील सर्व कायदेकानू स्त्रियांच्या बाजूने.सरकारी नोकरीतील काही विशिष्ट वर्गातील महिलेने एखाद्या सहकारी पुरुषावर “याने माझ्यावर अतिप्रसंग केला” अशी नुसती तोंडी तक्रार केली तरी “त्या पुरुषाला” आरोप सिद्ध होण्याआधीच अत्यंत अपमानास्पद प्रसंगांना सामोरं जावं लागतं;कुठे तोंड दाखवायलाही जागा रहात नाही.त्यांतील एक विदारक सत्यकथा.

पुण्याच्या सरकारी मेडिकल कॉलेज मधील वरिष्ठ अधिकारी मुंबईच्या एका मोठ्या सरकारी हॉस्पिटल मध्ये कामानिमित्त ‘डेप्युटेशन’ वर गेलेले.नक्की काय झालं माहित नाही,परंतु पोलिसांनी त्यांना तेथून सर्वांसमक्ष अक्षरश:फरफटत नेलं.अत्यंत दारूण विषण्ण अवस्थेत ते पुण्याला घरी आले.काहीतरी भयाण घडल्याचं त्यांचा चेहराच सांगत होता.डॉक्टरला बोलऊयात,घरचे मागे लागले.”आत्ता एवढ्या रात्री नको,जाईन मी उद्या त्यांच्याकडे” सांगून ते त्यांच्या दुस-या छोट्या ब्लॉकमध्ये झोपायला गेले.सकाळी बघतात तो काय,त्यांनी स्वत:चे जीवन संपवले होते….

खूप पूर्वीचं उदाहरण द्यायचं तर पुरुष घरात एकटा असताना एखाद्या बाईला चोरी करताना पकडलं तर ती स्वत:चे कपडे काढायला लागून आरडा-ओरडा करायला लागायची,त्याने तिच्यावर अत्याचार केल्याची बोंबाबोंब करून;जेणेकरून तो पोलिसात तक्रार करणार नाही…

-वासंती घैसास

2568 views
Ads

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

cool good eh love2 cute confused notgood numb disgusting fail