हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या प्रकरणावर देशभरात तीव्र पडसाद उमटले. सामूहिक बलात्कार आणि खून केल्याप्रकरणाचे पडसाद बीड जिल्ह्यात उमटले. दिल्लीत जंतरमंतर येथे सोमवारी काही लोकांनी एकत्र जमून आंदोलन केले. प्रत्येक जन वेगवेगळ्या पद्धतीने या घटनेविरोधात निदर्शने करत आहे. असंच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा अॅड. हेमा पिंपळे यांनी एक आगळ्या-वेगळ्या पद्धतीने निषेध केला, त्यांनी बीड शहरातील ४-५ ट्युशन क्लासला भेट देउन या विद्यार्त्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी भेट दिली. या विद्यार्त्यांना शपथ देउन आपल्या आई – वडिंलानी जी शिकवन दिली तीचं पालन करा असं सांगितलं. निर्भया प्रकरणानंतरही आज महिला समाजात असुरक्षित आहेत हेच हैदराबादच्या घटनेतून दिसून आले आहे. न्याय व्यवस्थेने जलद न्याय देऊन अशा अनेक पीडित महिलांच्या कुटुंबीयांना दिलासा द्यावा. निर्भया प्रकरणातील गुन्हेगार तुरुंगात आहेत, त्यांना फाशी देण्यात आलेले नाही. ते तुरुंगात व्यवस्थित जीवन जगत आहेत.
ज्या महिलांवर अत्याचार झाले त्यांच्या कुटुंबीयांच्या व्यथा वेदना कायम आहेत. असं देखिल त्या म्हटल्या. निर्भया प्रकरणानंतर पोक्सो कायदा झाला, मात्र प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी किती केली जाते हा प्रश्नचिन्हं आहे. बीड मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हैदराबाद महिला डॉक्टर प्रकरणाचा आणि महिला व मुलींनवर होणाऱ्या अत्याचाराचे निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा अॅड. हेमा पिंपळे यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.
Leave a reply