Article

priynka gandhi

देशामध्ये नवीन नोकऱ्यांचा अभाव हेच विकास न होण्याचे लक्षण- प्रियांका गांधी

देशातील तरुण पिढी देशाची संपत्ती आहे. भाजप सरकारने विकासाच्या नावावर सरकार आणले मात्र आजच्या तरुण पिढीच्या नोकऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे. देशामध्ये नवीन नोकऱ्यांचा अभाव हेच विकास न होण्याचे लक्षण आहे अशी टीका काँग्रेस नेत्या आणि महासचिव प्रियांका गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

देशातील बेरोजगारी संदर्भात त्यांनी आज २ ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. देशातील बांधकाम क्षेत्रात ३५ लाख लोकांच्या नोकऱ्या तर माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जवळपास ४० लाख लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. #मंदीकीमार असं ट्विट केलं आहे.

२०१४ मध्ये ऑल इंडिया मैन्युफैक्चरर्स ऑर्गनाइजेशन (AIMO) नुसार मैन्युफैक्चरिंग सेक्टरमध्ये 35 लाख लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या होत्या. याआधी प्रियांका गांधी यांनी एअर इंडिया आणि बीपीसीएलच्या विक्रीच्या विधानावरून भाजप सरकारवर निशाणा साधला होता.

39 views
Ads

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

cool good eh love2 cute confused notgood numb disgusting fail