Article

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सरसावल्या वर्षा उसगावकर

अनेक जण चित्रपटांत काम करण्यासाठी मुंबई शहरात येत असतात… कुणाला आपल्या यशाची गुरुकिल्ली मिळते तर कुणाला नाही. अशा अनेकांच्या कहाण्या आपण प्रत्यक्षात ऐकल्यात किंवा सिनेमात पाहिल्यात. चित्रपटात येण्यासाठी अनेकांची वर्षानुवर्ष निघून जातात. हे झालं आतापर्यंतच्या कलाकारांचा प्रवास मात्र यापुढे येणाऱ्या पिढीला शालेय जीवनापासून चित्रपट विश्वात आपलं करियर कसं करावं याचे धडे मिळणार आहेत.

युनेस्को (UNESCO) क्रिएटिव्ह सिटी नेटवर्क-२०१९ ने प्रतिष्ठित शहरांच्या यादीमध्ये मुंबई चे नाव समाविष्ठ व्हावे यासाठी सहकार्य मिळावे म्हणून मुंबई चे महानगर पालिका आयुक्त प्रवीण परदेशी  यांनी चित्रपट,साहित्य,लोककला इत्यादी क्षेत्राशी निगडित असणाऱ्या संस्थांची बैठक दि.२७ जून २०१९ रोजी महानगर पालिका मुख्यालय येथे आयोजित केली होती.

या बैठकीला महामंडळाचे सहकार्यवाह विजय खोचिकर, संचालिका वर्षा उसगावकर व संचालिका चैत्राली डोंगरे हे उपस्थित होते.

बैठकीमध्ये विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या विषयाचे चित्रपट प्रत्येक शाळेमध्ये दाखविण्यात यावेत व त्या चित्रपटांमधील कलाकार – तंत्रज्ञ यांच्यासोबत भेट घडवून आणावी जेणेकरून, विद्यार्थ्यांमध्ये चित्रपट क्षेत्राविषयी आवड निर्माण होईल व भविष्यात ते देखील आपले करियर या क्षेत्रामध्ये करण्याचा विचार करू शकतील यासंदर्भातली चर्चा बैठकीत झाली.

 

 

152 views
Ads

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

cool good eh love2 cute confused notgood numb disgusting fail